सोरायसिससाठी आहार विहार नियोजन
- गव्हाचा फ़ुलका, ज्वारीची भाकरी, मूगाच्या डाळीचे कढण.
- मूगाच्या डाळीचे वरण धने, जीरे, तूपाच्या फ़ॊडणीसह खावे.
- कुठलीही एक फ़ळभाजी (वांगे, बटाटा, टोमॅटो, रताळी सोडून ) धने, जीरे, तूपाच्या फ़ॊडणीसह खावे.
- तूप्, साखर पोळी खावी.
- ताजी जिलेबी, मोरावळा, गुलकंद, जास्त प्रमाणात खाणे.
- फ़ळे – मनुका (काळ्या), बेदाणे (पिवळे), खजूर, अंजीर, डाळींब, ही फ़ळे अधिक प्रमाणात खावी.
- मीठ पूर्णत: वर्ज्य करावे. शक्य नसल्यास थोड्या प्रमाणात शेंदेलोण खावे.
- चहा घेत असल्यास आले घातलेला चहा १/२ – १/२ कप दिवसातून २ वेळा चालेल.
- रात्री जागरण व दिवासा झोप पूर्णत: वर्ज्य करावी.
- ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन करावे.
- मधुमेही रुग्णांनी नाचणीची भाकरी , गाईचे तूप, कुठलीही एक फ़ळभाजी (वांगे, बटाटा, टोमॅटो, रताळी सोडून ) धने, जीरे, तूपाच्या फ़ॊडणीसह खाणे.