गर्भवती स्त्रीने पाळावयाचे पथ्य
पथ्य आहार / काय खावे :
- अन्न वार्ग : षष्टी तांदूळ, गहू, जूना तांदूळ, ज्वारी, नाचणी.
- द्विदल वर्ग : मूद, तूर, क्वचित मटकी, मसूर, कुळीथ, ताजा मटार.
- फ़ल वर्ग: डाळींब, सफ़रचंद, चिक्कू, नारळ, आवळा, गाजर, द्राक्षे, शेवटच्या महिन्यात अंजीर, संत्री, मोसंबी उपयुक्त, शहाळ्याचे पाणी उपयुक्त.
- फ़ळ भाज्या :पडवळ, कोबी, दुधी भोपळा, लाल भोपळा, फ़्लॉवर, दोडका, टोमॅटो, शिंगाडा, काकडी, कोहळा, बीट, तांदुळजा, चाकवत, चवळी, कोथिंबीर, लाल माठ.
- दुग्ध वर्ग: गाईचे दुध, तूप, लोणी.
- इतर : काळ्या मनुका, खजूर, खरीक, बदाम( दिवसातून फ़क्त १), भाजलेल्या पोह्याचा चिवडा, उपीट, शेवयाची खीर, भाजणीचे थालीपीठ, गुलकंद, शिरा, उपवासाला- राजिगिरा, भगर, बटाटा उकडलेला चालेल.
अपथ्य आहार / काय खावू नये :
- गवार, शेवगा, पपई, अननस, हिंग पूर्णत: वर्ज्य.
- बटाटा, रताळे, सुअर्न, शेपू, अळू, मका, वांगे.
- हरभरा व त्याचे पदार्थ, वाटाणा, चणा, राजमा, पावटा, छोले, मेथी, सोयाबीन (अत्यल्प)
- स्ट्रॉबेरी, साबुदाणा, दही, करडई, लोणच्याचा खार.
- शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ( डोसा, उत्तापा, इडली, आंबोळी)
- अतितिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खावू नयेत.
- मांसाहार ( चिकन, मटण मासे), व अंडी वर्ज्य.
- बेकरीतील पदार्थ (बिस्किट, पाव, खारी, मिठाई) वर्ज्य.
- फ़ास्टफ़ूड,- चायनीज, बर्गर, पिझ्झा, वडापाव आदी पूर्णत: वर्ज्य.