रक्तज अर्शाचे पथ्य
- गव्हाचा फ़ुलका / ज्वारीची भाकरी जेवणामध्ये असावी.
- मूगाचे / तुरीचे वरण – धने, जीरे, तूपाची फ़ोडणी देऊन घेणे. (मसाला, मिरची, तिखट वापरु नये.)
- कोणतीही फ़ळभाजी (बटाटा, वांगे, रताळे, सोडून ) धने, जीरे, तूपाची फ़ोडणी देऊन घेणे. . (मसाला, मिरची, तिखट वापरु नये.)
- पालेभाज्या बंद, कडधान्ये नकोत.
- लोणी, ताक, तूप जेवणात जास्त प्रमाणात वापरावे.
- उकळून गार केलेले पाणी प्यावे.
- जेवणानंतर अंजीर, मनुका, बेदाणे, आंबा, पपई, खारीक यापैकी कोणतेही एक फ़ळ योग्य प्रमाणात घ्यावे.
- डाळींबाचा रस, मोसंबीचा रस पिणे.
- तिखट, तळलेले, आंबवलेले पदार्थ बंद करावेत.
- चहा हवा असल्यास दोन वेळा अर्धा अर्धा कप आले टाकून घेणे.
- मोरावळा, गुलकंद खाणे.