लहान मुलांच्या पालाकांना सूचना

 • भूक लागून स्वत:हून मागितल्याशिवाय खाण्यास काहीही देवू नये. जेवण करण्यासाठी मागे लागू नये. 
 • सकाळी आंघोळीनंतर संपूर्ण अंग कोरडे करुन, टॉवेल गुंडाळून मगच बाथरुम मधून बाहेर आणावे. पावसात भिजणे टाळावे.
 • दूध देऊ नये. दूधातला चहा आले घालून दोन वेळा द्यावा. 
 • चॉकलेट, बिस्किट, खारी, टोस्ट असे बेकरीचे पदार्थ, ईडली, डोसा, पिझ्झा, बर्गर, असे आंबवलेले व मसालेदार पदार्थ देऊ नयेत. 
 • सॉस, जाम, वापरु नये. दही देऊ नये. 
 • फ़ळे पूर्ण बंद करावीत. 
 • गोड पदार्थ, मिठाई शक्यतोवर देऊ नये. 
 • खीर ताजी करुन कधीतरी चालेल. त्यामध्ये लवंग, वेलदोडा घालावा. 
 • पोळी, भाजी, वरण भात असे साधे जेवण द्यावे. (बटाटा, टोमॅटो, रताळे, वांगे शक्यतोवर टाळावे.)
 • मेथीचा थेपला, मूळ्याचे, कोबीचे पराठे, असे ताजे पदार्थ तसेच उपमा, पोहे, साळीच्या लाह्यांचा चिवडा असे पदार्थ द्यावेत. 
 • पाणी उकळून गार केलेले द्यावे.
 • भात / पोहे करण्यापूर्वी तांदूळ / पोहे भाजून घ्यावेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.


  ×

  Hello!

  Click below to chat on WhatsApp

  × How can I help you?