केस गळण्याची कारणे
१) डोक्यावरुन कडक पाण्याने आंघोळ करणे.
२) बोअरचे पाणी पिण्यासाठी अथवा आंघोळीसाठी वापरणे.
३) रोज केस ओले करणे.
४) शाम्पू – शाम्पूचा जास्त वापर करणे, नवनवीन शाम्पूचा वापर करणे.
५) केसांना तेल अजिबात न लावणे अथवा कमी प्रमाणात लावणे.
६) उपवास व डायटिंग अधिक प्रमाणात करणे.
७) दिवसा झोपणे व रात्री जागरण करणे.
८) चहा, कॉफ़ी, कोल्ड्रींक्स, फ़ास्ट फ़ूड, जंक फ़ूड, जास्त सेवन करणे.
९) शिळे अन्न पदार्थ खाणे.
१०) आंबट – दही, लिंबु, चिंच, पाणीपुरी, लोणचे, इ.चा वापर जास्त प्रमाणात करणे.
११) तिखट – मिरची, ठेचा (खर्डा), सर्व प्रकारच्या चटण्या, तिखट पदार्थांचा वापर अधिक करणे.
१२) खारट – मीठ व अधिक मीठ असलेले पदार्थ (कुरकुरे, चिप्स, वेफ़र्स, खारे शेंगदाणे) यांचा वापर अधिक प्रमाणात करणे.
१३) मेहंदी व हेअर डाय, हेअर कलर चा वापर अधिक प्रमाणात करणे.
१४) शारीरिक आजार – अम्लपित्त, पचनविकार, उष्णता, हाडी ताप, अजीर्ण, पोटाचे आजार, ढेकरा, गॅसेस, नियमित पोट साफ़ न होणे, त्वचा रोग, रक्ताचे प्रमाण कमी असणे, काविळ, टायफ़ॉईड, पाळीच्या तक्रारी, अंगावरुन पांढरे / लाल जाणे, गर्भाशयाचा आजार, इ.
१५) मानसिक आजार- मानसिक ताणतणाव, चिडचिडेपणा, स्ट्रेस, टेन्शन, निद्रानाश, डिप्रेशन, फ़्रस्ट्रेशन, इ
१६) पुरुषांमध्ये –गाडीवर प्रवास करणे, सर्व प्रकारची व्यसने ( तंबाखु, गुटखा, दारु, सिगारेट ) धातुक्षय (ब्रह्मचर्य पालन न करणे )
१७) आहार- आहारमध्ये दूध व तुपाचा वापर कमी प्रमाणात करणे अथवा अजिबात नसणे. पालेभाज्य, फ़ळे न खाणे, माती, खडू, इ. सतत खाणे.
१८) मांसाहाराचे सेवन अति प्रमाणात करणे.
वरील सर्व कारणांमुळे शरीरामध्ये रोज उष्णता, क्षार, विषारी तत्वे तयार होतात. ती रक्तामध्ये मिसळून केसांच्या मूळाशी जातात व त्याचा परिणाम केस गळणे, कोंडा होणे, केस पांढरे होणे, केसांचे पोषण न होणे, केसांची मुळे बंद होणे इत्यादिवर होतो. त्यामुळे अकाली, कमी वयामध्ये केस पिकतात व टक्कल पडते.