उंची वाढविण्यासाठी आहार विहार नियोजन

उंची वाढविण्यासाठी आहार विहार नियोजन

उंची वाढविण्यासाठी आहार विहार नियोजन (Height gain)

औषध कसे घ्यावे :

सकाळी घ्यावयाचे औषध रोज सकाळी ७ वाजायच्या आत घ्यावे. तत्पूर्वी सर्व प्रात:विधि आटोपून स्नान करणे आवश्यक आहे. औषध मोकळ्या पोटी घ्यावे. एक किलो अहळीव घेउन त्याचे ३० समान भाग करावे. (अहळीव हे लहान धान्य असल्याने त्यात कचरा व खडे भरपूर असतात. त्यासाठी ते निवडून, पाखडून, चाळून घ्यावे. अहळीव पाण्यात भिजवून स्वच्छ करु नये.) तीस दिवस दररोज सकाळी एक भाग अहळीव, आवडीनुसार साखर / बोर्नव्हिटा / कॉम्प्लान / शतावरी कल्प हे सर्व वाटीत एकत्र करुन हे मिश्रण थोडे थोडे तोंडात टाकून न चावता गाईच्या दुधासोबत गिळावे. दुध गाईचेच असावे. ते न मिळाल्यास म्हशीच्या १ लिटर दुधामध्ये २५०मि.लि. कडकडीत गरम पाणी घालून ते वापरावे. पहिल्या अर्धा लिटर दूध घ्यावे. नंतर दुधाचे प्रमाण वाढवत जावे. जास्तीत जास्त दुधाचा भाग सकाळी औषधाबरोबर घ्यावा. उरलेले दुध दिवसभरात संपवावे. महिन्याच्या अखेरीपर्यंत दोन ते अडीच लिटरपर्य़ंत दुध नेल्यास अधिक फ़ायदा दिसतो.

नाकात टाकावयाचे औषध :

दिलेल्या बाटलीतील पातळ औषध दररोज रात्री झॊपतान फ़क्त उजव्या नाकपूडीत एकच थेंब झोपून टाकावे व दहा मिनिटे तसेच पडून रहावे. 

उंची वाढविण्यासाठी आहार विहार नियोजन :

  1. गाईच्या धारोष्ण दुधाचा गुण अधिक आहे.
  2. दुध तापवून गार करुनही वापरता येते. कच्चे दुध देखील घेता येते.
  3. दोन्ही वेळा व्यवस्थित जेवण करता येते. परंतु तिखट, तेलकट, आंबट, मसालेदार, चमचमीत, वातुळ हे पदार्थ क्मी प्रमाणात घ्यावेत किंवा टाळावे.
  4. औषध सुरु झाल्यानंतर काही जणांना एक दोन जुलाब होतात. त्यातून अश्क्तपणा येत नाही. जुलाब होणे चांगले लक्षण आहे. जुलाब झाले नाही तरी फ़ायदा होवू शकतो.
  5. उपवासाला हे औषध चालते.
  6. ( स्त्रियांसाठी ) मासिक पाळी सुरु असताना फ़क्त औषध घ्यावे. व्यायाम करु नये.
  7. स्वत्:ची उंची सर्व परिस्थिती कायम ठेवून ( तोच टेप, तीच पट्टी व जागा, तीच मोजणारी व्यक्ती ) मोजून ठेवावी. भिंतीवर फ़क्त खूण करु नये. लाल पेनाने खूण करुन उंची, तारीख, वारांसहित मोजून डायरीमध्ये लिहून ठेवावी.
  8. या औषधाने जाडी वाढत नाही. म्हधीच्या दुधाने स्थूल लोकांचे वजन वाढू शकते. म्हणून त्यांनी शक्यतो गाईचेच दुध प्यावे.
  9. हे एक पूर्णत: निर्धोक, दुष्परिणाम रहित आयुर्वेदिक औषध आहे.
  10. पुलअप्स, दोरीवरच्या उड्या, पद्मासन, सर्वांगासन, ताडासन, पश्चिमोत्तानासन, यांचाही उंची वाढण्यासाठी करुन घ्यावा. हा सर्व व्यायाम जास्तीत जास्त पंधरा मिनिटे करावा.
  11. औषध घेण्यासाठी उंची वाढविण्यास इच्छुक व्यक्तिने प्रत्यक्ष तपासणी साठी यावे.
  12. सहा ते अठरा वयोगटामध्ये या औषधाचा ९५ % सुपरिणाम आहे. फ़क्त ५ % लोकांची उंची वाढत नाही. १८ ते २१ वयोगटामध्ये या औषधाचा ७० % सुपरिणाम आहे. परंतु उंची न वाढण्याचे प्रमाणही ३० % आहे. अशा लोकांनी एक वेळ औषध इच्छा व गरज असल्यास दिलेल्या वयोगटात वर्षातून केव्हाही व कितीही वेळा घेता येते.
  13. सांगितलेल्या प्रमाणात दुध घेणे, पथ्य पाळणे, औषध आणि व्यायाम खंड न पडता करणे या गोष्टी घडल्या तरच उंची वाढते. यापैकी एकाही गोष्टीत हलगर्जीपणा चालत नाही.
  14. एका वेळी औषध घेतल्यास पाव सें.मी.  पासून ३ इंचापर्यंत उंची वाढते असा अनुभव आहे. या औषधाचा परिणाम फ़क्त हाडावरच घडतो असे नसून तो शरीर घटकांवर सर्वत्र समान परिणाम घडतो. या औषधाचा परिणाम फ़क्त हाडावरच घडतो असे नसून तो शरीर घटकांवर सर्वत्र समान परिणाम घडतो. या औषधाचा परिणाम घेतल्यापासून एक ते चार महिन्यात दिसतो.
  15. अहळीव चावून खाल्ल्यास उष्ण असतात. ते गिळून खाल्ल्यास त्याचा उष्णपणा जाणवत नाही. दुधाचे प्रमाण जास्त ठेवल्यामुळे देखील अहळीव उष्णपणा जाणवत नाही.
  16. हे औषध चालू असताना अलोपॅथीक, होमिओपॅथिक औषधे इतर आजारांसाठी घेतल्यास चालतात. परंतु दिलेल्या पत्यावर किंवा फ़ोन नंबरवर संपर्क साधून आयुर्वेदिय औषधेही त्या त्या तक्रारी साठी उपलब्ध होऊ शकतील.
  17. लहान मुलांना ( ६ ते १३ वर्षापर्य़्ंत ) प्रकृती व बलानुसार दुध व अहळीव चे प्रमाण कमी करता येते. ते प्रत्यक्ष ऒउषध घेताना सांगितले जाते. चौदा वर्षापासून पुढे मात्र अहळीव व दुधाचा पूर्ण डोस जाणे आवश्यक आहे. औषध घेत असताना काही अडचणी आल्यास प्रत्यक्ष किंवा फ़ोनवरुन भेटून सल्ला विचारावा. परस्पर निर्णय घेउ नये. अहळीव, गूळ, खोबरे, यांचा लाडू व त्याबरोबर गोळ्या अशी औषध घेण्याची पद्धत वयाच्या तेरा वर्षापर्य़ंत चालू शकते. बाकी सर्व नियम सारखेच आहेत.
  18. नाकात टाकण्याचे औषध साधारण ५० दिवस पुरते. तितके दिवस ते वापरतच रहावे.
  19. या औषधाचा उपयोग व्यक्तिमत्व विकासाठी, निरनिराळ्या परीक्षांच्या पात्रतेसाठी व ज्यांचे आई- वडील उंचीने कमी आहेत. या बरोबरच न्यूनगंडाच्या भावना दूर होण्यासाठी चांगला होतो.
  20.  हे औषध १ महिना पूर्ण घेतल्यावर पुन्हा तपासणीस यावे. यावेळी पुन्हा उंची मोजली जाते व नंतरच्या म्हणजेच दुसर्या महिन्यात – १) सकाळ – सायंकाळ १ -१ ग्लास दुध घ्यावे. २) नेहमी करत असणारा व्यायाम करावा. ३) दोन्ही जेवणात एक मध्यम आकाराचा कांदा व एक गूळाचा खडा यांचे सेवन करावे.
  21. असे १ महिना पूर्ण घेतल्यावर पुन्हा तपासणीस यावे. यावेळी पुन्हा उंची मोजली जाते व नंतरच्या म्हणजेच तिसर्या महिन्यात – १) सकाळ – सायंकाळ १ -१ ग्लास दुध घ्यावे. २) नेहमी करत असणारा व्यायाम करावा. ३) दोन्ही जेवणात एक काकडी व चतकोर लिंबू सेवन करावे.
  22. यानंतर पुन्हा औषधाचा कोर्स केल्यास चांगला फ़ायदा होऊ शकतो.

Here in Vishwaswasthya we offer following courses tobenhance height of your child.

Basic Course:
We offer some specialised diet, Ayurvedic Medicines & some Yoga posture and exercise.

Advanced course:
In this we offer some special treatments from pancha karma Like Basti, Nasya, etc. alongwith specialised diet, Ayurvedic Medicines & some Yoga posture and exercise.

Course Duration : 3 month.
(If you get desired results then you can repeat the course)

(Age limit Applicable)

contact :

Dr. Pruthviraj Ugale
(MD Panchakarma)
8087236239

Dr. Pallavi Ugale
(MD ayurved)
9168009138

Visiting hours:
10am to 2pm
&
6pm to 9pm
Sunday by appointment

To know more about us visit our Website: www.vishwaswasthya.com

Google Location:
https://maps.app.goo.gl/KkNMVndKWMR3b3ph6

E visiting card: www.vishwaswasthya.com/v

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.






    ×

    Hello!

    Click below to chat on WhatsApp

    × How can I help you?