म्हणून प्रत्येकाने दर वसंत ऋतुमध्ये वमन केल्यामुळे ऋतुजन्य विकार होत नाहीत. तसेच असलेले, वाढलेले आजार कमी होतात. सर्दी, ताप, त्वचेचे विकार, पोटाचे विकार, अम्लपित्त, डोकेदुखी, आमवात आदी विकारांकरीता वमनाचा प्रामुख्याने विचार वैद्यांच्या सल्ल्याने करु शकता.
उंची वाढविण्याच्या या औषधाचा उपयोग व्यक्तिमत्व विकासाठी, निरनिराळ्या परीक्षांच्या पात्रतेसाठी व ज्यांचे आई- वडील उंचीने कमी आहेत. या बरोबरच न्यूनगंडाच्या भावना दूर होण्यासाठी चांगला होतो. सांगितलेल्या प्रमाणात दुध घेणे, पथ्य पाळणे, औषध आणि व्यायाम खंड न पडता करणे या गोष्टी घडल्या तरच उंची वाढते.