बस्ति पंचकर्मासाठीचे नियम

 1. बस्ति चे तेलबस्ति व काढाबस्ति असे दोन प्रकार असतात.
 2. तेलाचा बस्ति घेण्यापूर्वी नेहमी मूगाच्या डाळीची खिचडी किंवा पथ्यात सांगितलेला हलका आहार घ्यावा.
 3. काढ्याचा बस्ति नेहमी उपाशीपोटी घ्यावा किंवा आधीचे घेतलेले जेवन पचलेले असावे. (काढ्याचा बस्ति घेण्यापूर्वी ४-५ तास काही खावू नये.
 4. सर्दी, ताप, खोकला, कणकण असताना बस्ति घेऊ नये.
 5. पाळीच्या दिवसात बस्ति घेऊ नये. पाळी संपल्यानंतर प्रथम तेलाचा बस्ति घ्यावा व नंतर पुढील बस्तिंचा क्रम चालू ठेवावा.
 6. काही कारणास्तव पोट दुखल्यास पोट गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. गरम पाणी व ओवा डॉक्टरांना विचारुन खावा.
 7. बस्ति सुरु असताना दिवसभर पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा.
 8. थंड पाणी पिणे व थंड वातावरण टाळावे.
 9. मल मूत्रांच्या वेगांचा अवरोध करु नये.
 10. व्यायाम अथवा कष्टाची कामे करु नये.
 11. रागावणे, चिंता करणे, शोक करणे टाळावे.
 12. ऊन, वारा, पाऊस यांचे सेवन करु नये.
 13. दिवसा झोपू नये, रात्री जागरण करु नये.
 14. प्रवास करणे टाळावे.
 15. फ़ार बोलणे, एकाच ठिकाणी बसणे, उभे राहाणे टाळावे.
 16. फ़ार उंच उशी किंवा अजिबात उशी न घेणे टाळावे, समतल  उशी घ्यावी.
 17. धूर, धूराळा यांपासून दूर राहावे.
 18. ब्रह्मचर्याचे पालन करावे.
 19. पंचकर्म सुरु असताना मूगाची पातळ खिचडी थोडे तूप टाकून घ्यावी.
 20. भाताची पेज धने जीरे तूपाची फ़ोडणी देवून घेणे.
 21. बस्तिसाठी येताना सोबत टॉवेल, नॅपकिन, स्कार्फ़, स्वेटर / जर्किन, सॉक्स, गरम पाणी, बस्ति सिरींज, दोन कॅरिबॅग, मूग खिचडी चा डबा घेऊन येणे.
 22. बस्तिसाठी येताना आपणास दिलेली बस्ति सिरींज जंतुसंसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ करुन घेऊन यावी. प्रथम सिरींज गरम पाण्याने धुवावी, नंतर ती साबणाच्या पाण्याने बॉटलक्लिनरच्या सहाय्याने स्वच्छ धुवावी. त्यानंतर सिरींज उकळत्या पाण्यात ३-५ मिनिट ठेवून नंतर कोरडी करुन स्वच्छ कॅरी बॅग मध्ये ठेवावी.
 23. पंचकर्मासाठी दवाखाण्यात येत असताना मौल्यवान वस्तु / दागिणे सोबत आणू नये अथवा स्वत:च्या जबाबदारीवर आणावेत. गहाळ झाल्यास क्लिनिक / डॉक्टर जबाबदार राहणार नाहीत.

  * हे नियम पंचकर्म सुरु असताना व त्यानंतर जितके दिवस पंचकर्म सुरु होते त्याच्या दुप्पट दिवस पाळावेत.

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.


  ×

  Hello!

  Click below to chat on WhatsApp

  × How can I help you?