बस्ति पंचकर्मासाठीचे नियम
- बस्ति चे तेलबस्ति व काढाबस्ति असे दोन प्रकार असतात.
- तेलाचा बस्ति घेण्यापूर्वी नेहमी मूगाच्या डाळीची खिचडी किंवा पथ्यात सांगितलेला हलका आहार घ्यावा.
- काढ्याचा बस्ति नेहमी उपाशीपोटी घ्यावा किंवा आधीचे घेतलेले जेवन पचलेले असावे. (काढ्याचा बस्ति घेण्यापूर्वी ४-५ तास काही खावू नये.
- सर्दी, ताप, खोकला, कणकण असताना बस्ति घेऊ नये.
- पाळीच्या दिवसात बस्ति घेऊ नये. पाळी संपल्यानंतर प्रथम तेलाचा बस्ति घ्यावा व नंतर पुढील बस्तिंचा क्रम चालू ठेवावा.
- काही कारणास्तव पोट दुखल्यास पोट गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. गरम पाणी व ओवा डॉक्टरांना विचारुन खावा.
- बस्ति सुरु असताना दिवसभर पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा.
- थंड पाणी पिणे व थंड वातावरण टाळावे.
- मल मूत्रांच्या वेगांचा अवरोध करु नये.
- व्यायाम अथवा कष्टाची कामे करु नये.
- रागावणे, चिंता करणे, शोक करणे टाळावे.
- ऊन, वारा, पाऊस यांचे सेवन करु नये.
- दिवसा झोपू नये, रात्री जागरण करु नये.
- प्रवास करणे टाळावे.
- फ़ार बोलणे, एकाच ठिकाणी बसणे, उभे राहाणे टाळावे.
- फ़ार उंच उशी किंवा अजिबात उशी न घेणे टाळावे, समतल उशी घ्यावी.
- धूर, धूराळा यांपासून दूर राहावे.
- ब्रह्मचर्याचे पालन करावे.
- पंचकर्म सुरु असताना मूगाची पातळ खिचडी थोडे तूप टाकून घ्यावी.
- भाताची पेज धने जीरे तूपाची फ़ोडणी देवून घेणे.
- बस्तिसाठी येताना सोबत टॉवेल, नॅपकिन, स्कार्फ़, स्वेटर / जर्किन, सॉक्स, गरम पाणी, बस्ति सिरींज, दोन कॅरिबॅग, मूग खिचडी चा डबा घेऊन येणे.
- बस्तिसाठी येताना आपणास दिलेली बस्ति सिरींज जंतुसंसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ करुन घेऊन यावी. प्रथम सिरींज गरम पाण्याने धुवावी, नंतर ती साबणाच्या पाण्याने बॉटलक्लिनरच्या सहाय्याने स्वच्छ धुवावी. त्यानंतर सिरींज उकळत्या पाण्यात ३-५ मिनिट ठेवून नंतर कोरडी करुन स्वच्छ कॅरी बॅग मध्ये ठेवावी.
- पंचकर्मासाठी दवाखाण्यात येत असताना मौल्यवान वस्तु / दागिणे सोबत आणू नये अथवा स्वत:च्या जबाबदारीवर आणावेत. गहाळ झाल्यास क्लिनिक / डॉक्टर जबाबदार राहणार नाहीत.
* हे नियम पंचकर्म सुरु असताना व त्यानंतर जितके दिवस पंचकर्म सुरु होते त्याच्या दुप्पट दिवस पाळावेत.