गेला थंडीचा महिना, झटपट वमन करा

Vaman Panchakarma

“आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा” या प्रसिद्ध गाण्याने मराठी मनावर बरेच अधिराज्य केले. थंडिचा प्रतिकार करण्याची प्रेरणाच जणु या गाण्यातून मिळायची. थंडिच्या दिवसात आजारांना वावच नसतो मुळी. त्यामुळे दबा धरून बसलेले आजार थंडीचे दिवस संपल्यानंतर आक्रमण करतात. त्यांच्या प्रतिकारासाठी म्हणून, “गेला थंडीचा महीना, झटपट वमन करा” हा सल्ला.

हिमालयामध्ये थंडिच्या दिवसात बर्फ पडून उन्हें तापू लागताच हा बर्फ़ पातळ होवून तिकडील नद्यांना उन्हाळ्यामध्ये पूर येतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये होते. थंड ऋतूत, थंडी तसेच पौष्टिक आहारामुळे शरीरात कफ़ जमा होऊ लागतो. हिवाळा संपताच ऊन तापू लागते. ज्याला “वसंत ऋतु असे म्हणतात. या उन्हामुळे शरीरात जमा झालेला कफ़ पातळ होवून नद्यांना पूर यावा त्याप्रमाणे हे दोष नखापासून केसापर्यंत सर्व शरीर व्यापतात. मग विविध आजार नव्याने उद्भवतात वा आधी असलेले आजार उचल खातात. डाक्टरांची पायरी याचवेळी तुम्ही चढता असा तुमचा आजपर्यंचा अनुभव असेल. या आजारांना आळा घालण्यासाठी तुम्ही युद्धपातळीवर अयशस्वी प्रयत्न करता. होय ! अयशस्वी प्रयत्न ! कारण नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा ते पाणी गावामध्ये घुसते. गावातील पाण्याचा उपसा करण्याची आवश्यकता नाही. नदीचा पूर ओसरताच गावातील पाणी आपोआप कमी होणार अगदी हेच गणित वसंत ऋतूत वाढलेल्या आजारांसंदर्भात दोष कोठयात वाढले, तेथून ते सर्व शरीरभर पसरले. त्यामुळे आजारांवर काम करण्याऐवजी वाढलेले दोष कोठयातून बाहेर काढून फेकल्यास “ना रहेगा बास ना बजेगी बासूरी”. वाढलेले दोष घाऊक प्रमाणावर शरीराबाहेर काढण्याच्या प्रक्रियेला “वमन” (उलटी करवणे) असे म्हणतात.

शा तहेची शुद्धिप्रक्रिया अमलात न आणल्यास पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलओ वैसा प्रमाणे वाढलेले दोष ज्या ज्या अवयवांमध्ये जाणार तशा स्वरुपाचे आजार होणार. सर्दी (Rhinitis), ताप (Fever), खोकला (Cough), उलट्या (Vomitting), अंगावर पित्त उठणे (Urticaria), श्वास (Asthama) लागणे अशा स्वरुपाचे काहिही होणार. याउपरी सुद्धा दोषांचा उपसा केला नाही हे पाणी तिथेच खोल खोल मुरणार. यालाच तुम्ही जीर्ण, जुनाट आजार म्हणता जसे डायबिटिस (Diabetes), हृदयविकार, त्वेचेचे विकार, दमा. अशा वेळी तुम्ही म्हणता, या पॅथीची, त्या पॅथीची औषधे केली पण काही गुण आला नाही. कालपर्यंत एका गोळीने काम भागायचे पण आता दोन सुद्धा कमी पडतात.’

अशावेळी सुद्धा इलाज एकच पंचकर्म म्हणजे पुन्हा वमनच. तेव्हा आजार वाढवून घेण्यापूर्वीच वमन करून स्वास्थ्यलाभ घेणे काय वाईट ? हा उपचार लहान बालकापासून ६० वर्षाच्या स्त्री व पुरुष दोघांनाही करुन घेता येतो.

काही लोक विचारतात, मागील वर्षी वमन केले होते परत या वर्षी कशाला? काल जेवलो, काल कपडे धुतले मग केव्हाच जेवायला किंवा कपडे धुवायला नको काय ? गाडीचे अॅव्हरेज वाढण्यासाठी नियमित सर्व्हिसिंग आवश्यक असते. तसेच पंचकर्माचे. गाडीचा एखादा पार्ट निकामी झाला तर बदलता तरी येतो पण या देव देणगी असलेल्या देहाचे काय ? नियमित पंचकर्मामूळे आजार तर होतच नाहीत शिवाय निरोगी दीर्घायुष्य बोनस स्वरुपात लाभते.

म्हणून प्रत्येकाने दर वसंत ऋतुमध्ये वमन केल्यामुळे ऋतुजन्य विकार होत नाहीत. तसेच असलेले, वाढलेले आजार कमी होतात. सर्दी, ताप, त्वचेचे विकार, पोटाचे विकार, अम्लपित्त, डोकेदुखी, आमवात आदी विकारांकरीता वमनाचा प्रामुख्याने विचार वैद्यांच्या सल्ल्याने करु शकता.

वमन पंचकर्माची सविस्तर माहिती करुन घेण्यासाठी आजच श्री विश्र्वस्वास्थ्य आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म चिकित्सालय येथे वैद्य. पृथ्वीराज उगळे किंवा वैद्य. पल्लवी उगळे यांच्याशी संपर्क साधा.

Dr. Pruthviraj Ugale
(MD Panchakarma)
8087236239

Dr. Pallavi Ugale
(MD ayurved)
9168009138

Visiting hours:
10am to 2pm
&
6pm to 9pm
Sunday by appointment

To know more about us visit our Website: www.vishwaswasthya.com

Google Location:
https://maps.app.goo.gl/KkNMVndKWMR3b3ph6

E visiting card: www.vishwaswasthya.com/v

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.






    ×

    Hello!

    Click below to chat on WhatsApp

    × How can I help you?