Virechan in Sharad Rhutu शरद ऋतुतील पंचकर्म – विरेचन
Virechan in Sharad Rhutu:
सध्या पैसा, काम, संसार, टेन्शन, जबाबदरी यामुळे घरातील प्रत्येकाचे जीवन संघर्षमय व धावपळीचे झाले आहे. प्रत्येक मनुष्य सध्या तणावग्रस्त जीवन आणि Curry व त्यामुळे व्याधीग्रस्त झालेले शरीर घेवून जीवन संघर्ष करीत असलेला दिसतो. अशा स्पर्धात्मक युगात Hurry (धावपळ), Worry (चिंता) (मसालेयुक्त आहार) प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण करीत आहेत. यामुळे निर्माण होणारी Acidity (अम्लपित्त), Constipation (मलबद्धता) त्यासाठी अनेक प्रकारची Antacids (ओमेज, ऍसिलॉक सारखी पित्तहर औषधे), Purgatives (मलशुद्धिकर) औषधे घेवून सुद्धा चालूच राहिलेले दिसते.
हल्ली अनेक प्रकारचे त्वचारोग (Skin diseases) व्यवहारात पाहायला मिळतात. सोरायसिस, इसब, नागिण, पिंपल्स, एक्झिमा, अंगावर पित्त उठणे, गांध्या येणे, खाज सुटणे अशी खूपशी नावे संगता येतील, पण आयुर्वेदानुसार हे सर्व त्वचेचे विकार रक्ताशी संबंधीत आहे. शरीरात रक्त शुद्ध असेल तर त्वचा देखील चांगली निरोगी राहते.
वजन वाढणे हा सध्याचा ज्वलंत प्रश्न, स्त्रीयांच्या पाळीच्या समस्या, दमा, आमवात, एन्डोक्राईन डिसऑर्डर या सर्व आजारंसाठी आयुर्वेदाकडे रामवाण उपाय आहे तो म्हणजे पंचकर्मातील सर्वोत्कष्ठ चिकित्सा “विरेचन चिकित्सा (Virechan).
विरेचन म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने करविलेला जुलाब होय. शरीरात वाढलेला पित्त दोष जुलाबाद्वारे शरीराच्या अधोमार्गाने बाहेर काढून टाकणे म्हणजे विरेचन होय. विरेचनामुळे जुलाब होत असले तरी यामध्ये शरीर जुलाबासाठी तयार करुन त्यानंतर जुलाब करविले जातात. त्यामुळे शरीरात जुलाबानंतर (विरेचनानंतर) थकवा न येता शरीर हलके होते.
विरेचन हे लहानांपासून वृद्धांपर्य़ंत ऋतुनुसार शारीरिक बलानुसार, अवस्थेनुसार व आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेता येऊ शकते.
शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन करण्यासाठी विरेचनापूर्वी वर्धमान मात्रेत म्हणजे वाढत्या मात्रेत औषधानी सिद्ध केलेले तूप (घृतपान ) घेण्यास सांगितले आहे. म्हणजे त्यामुळे जठर, आतड्यांना स्नेहनाचे ( मालीश – Lubrication ) कार्य होऊन विरेचनाच्या औषधाने शरीरातील दोष विनासायास बाहेर निघून जाण्यास मदत होते. हे आभ्यंतर स्नेहन ३ दिवस, ५ दिवस अथवा ७ दिवस रुग्णाच्या कोठ्यानुसार – पचनशक्तिनुसार केले जाते. अशा पद्धतीने शरीर आतून स्निग्ध झाल्यानंतर २-३ दिवस शरीराला बाहेरुन स्निग्ध करण्यासाठी मालीश वाफ़ ( स्नेहन स्वेदन ) केली जाते. त्यानंतर रुग्णाच्या आजारानुसार, प्रकृतीचा, बलाचा, ऋतुचा विचार करुन विरेचनाचे औषध दिले जाते.
म्हणून प्रत्येकाने दर शरद ऋतुमध्ये विरेचन केल्यामुळे ऋतुजन्य विकार होत नाहीत. तसेच असलेले, वाढलेले आजार कमी होतात. त्वचेचे विकार, पोटाचे विकार, अम्लपित्त, डोकेदुखी, आमवात आदी विकारांकरीता विरेचनाचा प्रामुख्याने विचार वैद्यांच्या सल्ल्याने करु शकता.
आयुर्वेदानुसार विरेचन हे पंचकर्म “शरद ऋतुमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत करावे. या काळात शरीरात पित्त निसर्गतः प्रकुपित होते. ते शरीरातून बाहेर काढून टाकल्यास असलेले आजार बरे होतात व नवीन होणाऱ्या आजारांना प्रतिबंध होतो.
सोरायसिस (Psoriasis) , इसब (Eczema), नागिण (Herpes) , पिंपल्स (तारुण्यपिटिका), एक्झिमा, अंगावर पित्त उठणे (Urticaria), गांध्या येणे, खाज सुटणे, त्वचेची कांती सुधारण्यासाठी, पांढरे कोड (Leucoderma), स्त्रीयांच्या पाळीचे विकार, वजन वाढणे (स्थौल्य- Obesity), दमा (Asthma), आमवात (Rheumatoid Arthritis), वातरक्त (Gout) , मूळव्याध, अपचन (Indigestion), अम्लपित्त (Acidity), कावीळ (Hepatitis), आव पडणे (dysentery), हाता पायांच्या तळव्यांची आग होणे, डोकेदुखी यासारख्या आजारांसाठी विरेचन चिकित्सा आजारांसाठी उपयुक्त ठरते.
Visit Shree Vishwa Swasthya Ayurvedic Clinic & Panchakarma Chikitsalaya for Virechan Panchakarma.