मधुमेही रुग्णांसाठी आहार / विहार नियोजन

पथ्य आहार ( हे खावे ) :

१. अन्नवर्ग – गहू, जव (Barley), वरीचे तांदूळ, नाचणी, ज्वारी ( भाजलेले ) धान्य १ वर्ष जुने करुन वापरणे इष्ट.

२. द्विदलवर्ग ( डाळी ) – मूग, मसूर, कुळीथ, तूर, मटकी,

३. शाकवर्ग ( पालेभज्या ) – मेथी, पालक, तांदूळजा, शेवगा, कोबी, मूळा, 

४. फ़ळभाज्या – दोडका, पडवळ, कारले, फ़्लॉवर्, सिमला मिरची, घोसाळे (वांगे, बटाटा ,टोमॅटो, रताळे सोडून)

५. कंद – लसूण, आले, गाजर, मूळा, कांदा, नवलकोबी

६. ताजे गोडसर ताक.

७. फ़ळे – उंबराची फ़ळे, कच्ची केळी, जांभूळ, कवठ,

८. इतर पदार्थ – जांभूळमध, तीळ, लवंग, वेलची, खसखस, तमालपत्र, गोमूत्र,आले-हळदीचे लोणचे.

९. मांसाहार – मांसरस ( घरी बनवलेले मटन क्लिअर सूप )

१०.संस्कारीत जल ( उकळून गार केलेले पाणी )

११. अन्न चावून खावे. दोन जेवणाच्या मध्ये भूक लागल्याशिवाय काही खाऊ नये. बिन साखर, बिन दुधाचा १/२ कप चहा, दिवसातून २ वेळा. (२ जेवणांच्या मध्ये )

अपथ्य आहार (हे खाऊ नये ):

१. अन्नवर्ग : नवे तांदूळ, बाजरी, गहू, (सर्व नवीन धान्ये )

२. शाकवर्ग ( पालेभज्या ) – भेंडी, तॊंडली

३. द्विदलवर्ग ( डाळी ) – उडीद, चवळी, सोयाबीन, पावटा, डबलबी, घेवडा

४. फ़ळभाज्या – वांगे, बटाटा, रताळ 

५. कंद – रताळे, बटाटा, साबूदाणा

६. थंड पाणी पिऊ नये, तहानेशिवाय पाणी पिऊ नये, अधिक मीठ खाऊ नये, शिळे अन्न खाऊ नये. 

७. फ़ळे – पिकलेले केळे, चिक्कू, सिताफ़ळ, सफ़रचंद, आंबा, द्राक्षे, ताडगोळा, कोहळा, ( जास्त गोड फ़ळे )

८. मांसाहार – मासे, ब्रॉयलर कोंबडीचे चिकन

९. इतर पदार्थ – दही, चीज, श्रीखंड, बासुंदी, खवा, चॉकलेट, आइस्क्रिम, मिल्क शेक, ऊसाचा रस, गूळ, बेकरीचे पदार्थ,   

    फ़ास्ट फ़ूड, ज्युस

विहार 

१. रोज ४ किलोमीटर चालणे व १२ सुर्यनमस्कार.

२. दिवसा झोपू नये. जेवणाच्या वेळा सकाळी ११ व संध्या. ८ अशा असाव्यात. झोपण्यापूर्वी खाणे अथवा पिणे टाळावे.

३. मल, मूत्र वेग अडवू नये.

४. आंघोळीसाठी उटणे वापरावे.

५. रात्री जागरणे करु नये. रात्रीचे जेवण व झोप यात किमान दिड तासाचे अंतर असावे.

६. AC मध्ये बसू नये. 

७. योगासने – हलासन, नौकासन, चक्रासन, ताडासन, वक्रासन, शवासन

८. रोज १५-२० मिनिटे ध्यान (मेडिटेशन ) करावे. मन प्रसन्न ठेवावे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.






    ×

    Hello!

    Click below to chat on WhatsApp

    × How can I help you?