नस्य पंचकर्माचे नियम
- नस्य हे पंचकर्म पाऊस पडत असताना करु नये.
- ७ वर्षाखालील मुले, गर्भीणी यांनी नस्य करु नये.
- नस्यापूर्वी व नस्यानंतर १ तास काहीही खाऊ अथवा पिऊ नये. १ तासापूर्वी भूक लागलेली असल्यास हलका आहार घ्यावा.
- नस्य हे पंचकर्म सुरु असताना थंड पदार्थ खाऊ अथवा पिऊ नये.
- नस्यापूर्वी व नस्यानंतर थंड पाण्याने डोक्यावरुन आंघोळ करु नये; छोटे केस असनारे पुरुषांनी कोमट पाण्याने केस धुवावेत. व आंघोळीनंतर कोरडे करावेत, केस ओले ठेवू नयेत.
- मद्यपान करु नये.
- आहार पचण्यास हलका, गरम असावा.
- पाणी गरम प्यावे.
- मल, मूत्रांच्या वेगांचा अवरोध करु नये.
- रागावणे, शोक, चिंता करु नये.
- ऊन, वारा यांचे सेवन करु नये.
- दिवसा झोपू नये व रात्री जागरण करु नये.
- लांबचा प्रवास करणे टाळावे.
- नस्यानंतर लगेच हसने, बोलणे, रागावने, शोक करणे टाळावे.
- व्यायाम करु नये.
- फ़ार उंच किंवा उशी न घेणे टाळावे.
- ब्रह्मचर्याचे पालन करावे.
- धूर, धूरळा यांचेपासून दूर राहावे.
- नस्य पंचकर्मासाठी येताना तोंडाला बांधण्यासाठी स्कार्फ़, टॉवेल, सॉक्स, नॅपकिन या वस्तू सोबत आणाव्यात.