पित्तविकारांसाठी आहार / विहार नियोजन
पथ्य आहार ( हे खावे ) :
- अन्नवर्ग : गव्हाचे फ़ुलके, चपाती, ज्वारीची भाकरी, साळीच्या लाह्या, जुने तांदूळ किंवा भाजलेल्या तांदळाचा भात
- द्विदल वर्ग (डाळी) : मूग (हिरवे / पिवळे), मसूर
- फ़ळभाज्या : पडवळ, दुधी भोपळा, भेंडी, दोडका, घोसावळे, कोबी, काकडी, कारले, शिंगाडा, केळफ़ूल,
- शाकवर्ग ( पालेभाज्या ) : पालेभाज्य वर्ज्य ( तांदळीची भाजी धने, जीरे, तूपाची फ़ोडणी देऊन )
- आहारात धने, जीरे, कोथिंबीर, आले यांचा जास्त वापर करावा.
- गाईचे दूध, तूपा, लोणी, खवा, ताजे गोडसर ताक, आवळ्याची चटणी, मोरावळा, गुलकंद, कोहळापत्रक, लिंबू सरबत, शेवयाची खीर, शिरा.
- फ़ळे : गोड आंबे, काळे मनुके, खजूर, द्राक्षे, जर्दाळू, बेदाणे, अंजीर, डाळींब, आवळा, कवठ, कोहळा, मोसंबी, नारळाचे पाणी, ऊसाचा रस.
अपथ्य आहार (हे खाऊ नये ):
- अन्नवर्ग : वरी, बाजरी, नाचणी, जव, सर्व प्रकारची नवीन
- शाकवर्ग ( पालेभज्या ) – वर सांगितलेल्या पालेभाज्यांव्यतिरिक्त इतर पालेभज्या.
- द्विदलवर्ग ( डाळी ) – उडीद, सुक्या कडधान्यांची उसळ, हुलगे, हरभरा, बेसनाचे पदार्थ.
- फ़ळभाज्या – वांगी, गवारी, कंद – रताळे, बटाटा, साबूदाणा
- पालेभाज्या – मेथी, शेवगा, अंबाडी, शेपू, पालक, राजगीरा, पोफ़ळा, पालक.
- थंड पाणी पिऊ नये, तहानेशिवाय पाणी पिऊ नये, अधिक मीठ खाऊ नये, शिळे अन्न खाऊ नये.
- फ़ळे – संत्री, अननस, पपई, केळी,
- विरुद्धाअन्न : मूगाची खिचडी + दूध, फ़्रूट सॅलेड (दूध+फ़ळे), दही+भात, केळ्याचे शिकरण, चहाचे आधी किंवा नंतर लगेच पाणी पिणे.
- आंबवलेले पदार्थ : इडली, डोसा, ढोकळा, उत्ताप्पा.
- व्यसन- दारु, सिगरेट, तंबाखू, इ.
- बाहेरचे पदार्थ: बेकरी प्रॉडक्टस्, चायनीज, फ़ास्ट फ़ूड, बर्गर, समोसा, पिझ्झा, वडापाव, मिसळ, समोसा, वडा, थालीपीठ,
- शिळे पाणी (कालचे पाणी आज पिणे )
- मासे व मांसाहार
विहार (वागण्या फ़िरण्यातील नियम )
- थंड पाण्याने आंघोळ, पिणे टाळावे. पिण्यासाठी व आंघोळीसाठी गरम पाणी प्यावे.
- उन्हात फ़िरणे, चिंता करणे, फ़ार दगदग करु नये.
- जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळाव्या. सकाळचे जेवण ११ पूर्वी व रात्री ८ च्या आधी करावे.
- मल मूत्राच्या वेगांचे धारण करू नये.
- वेडेवाकडे बसने / झोपणे टाळावे.
- रात्री जागरण करु नये व दिवसा झोपू नये.
- अतिमैथुन / अतिव्यायाम टाळावा., थंड पाण्यात पोहणे, आंघोळ करणे टाळावे.
- रात्रीचे जेवणानंतर शतपावली करावी.
- शीतल व डोळ्याला थंडावा निर्माण करणारी वस्त्रे वापरावित.