नस्य पंचकर्माचे नियम

  • नस्य हे पंचकर्म पाऊस पडत असताना करु नये.
  • ७ वर्षाखालील मुले, गर्भीणी यांनी नस्य करु नये.
  • नस्यापूर्वी व नस्यानंतर १ तास काहीही खाऊ अथवा पिऊ नये. १ तासापूर्वी भूक लागलेली असल्यास हलका आहार घ्यावा.
  • नस्य हे पंचकर्म सुरु असताना थंड पदार्थ खाऊ अथवा पिऊ नये.
  • नस्यापूर्वी व नस्यानंतर थंड पाण्याने डोक्यावरुन आंघोळ करु नये; छोटे केस असनारे पुरुषांनी कोमट पाण्याने केस धुवावेत. व आंघोळीनंतर कोरडे करावेत, केस ओले ठेवू नयेत.
  • मद्यपान करु नये.
  • आहार पचण्यास हलका, गरम असावा.
  • पाणी गरम प्यावे.
  • मल, मूत्रांच्या वेगांचा अवरोध करु नये.
  • रागावणे, शोक, चिंता करु नये.
  • ऊन, वारा यांचे सेवन करु नये.
  • दिवसा झोपू नये व रात्री जागरण करु नये.
  • लांबचा प्रवास करणे टाळावे.
  • नस्यानंतर लगेच हसने, बोलणे, रागावने, शोक करणे टाळावे.
  • व्यायाम करु नये.
  • फ़ार उंच किंवा उशी न घेणे टाळावे.
  •  ब्रह्मचर्याचे पालन करावे.
  • धूर, धूरळा यांचेपासून दूर राहावे.
  • नस्य पंचकर्मासाठी येताना तोंडाला बांधण्यासाठी स्कार्फ़, टॉवेल, सॉक्स, नॅपकिन या वस्तू सोबत आणाव्यात.

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.






    ×

    Hello!

    Click below to chat on WhatsApp

    × How can I help you?