गर्भिणीचा विहार – काय करावे आणि काय करु नये.
गर्भिणीचा विहार – काय करावे आणि काय करु नये.
१) रात्री जागरण करु नये व दिवसा झोपू नये.
२) वेडे वाकडे बसणे व झोपणे टाळावे.
३) पाठीवर झोपू नये, शक्यतो एका कुशीवर झोपावे. (डाव्या कुशीवर)
४) बसताना पाठीचा कणा ताठ ठेवावा.
५) अतिश्रम करणे टाळावे.
६) अतिप्रवास करणे टाळावे.
७) खाली वाकताना गुडघ्यामध्ये वाकावे.
८) उंच टाचेचे चप्पल वापरु नये.
९) लाल व काळी वस्त्रे घालू नये.
१०) वस्त्रे शुभ्र व ऊबदार असावीत, तंग कपडे घालू नयेत.
११) ब्रह्मचर्याचे पूर्ण पालन करावे. (मैथून करु नये)
१२) मल, मूत्राच्या वेगांचे धारण करु नये.
१३) धार्मिक व सकारात्मिकता वाढविणारी पुस्तके वाचावीत.
१४) प्रत्येक महिन्याचे औषध नियमित घ्यावे.
१५) सुख प्रसवासाठी ( Normal Delivery) नवव्या महिन्यात अनुवासन बस्ति डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावेत.
१६) ग्रहण काळात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
१७) शतावरी कल्प व अनंता कल्प दुधासोबत घ्यावा. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
१८) शहाळ्याचे पाणी नियमित प्यावे. तसेच शहाळ्याची मलई खावी.
१९) योगासने व प्राणायाम करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२०) नेहमी आनंदित राहावे. (हर्षो गर्भजननानाम् ।)