वातविकारांसाठी आहार / विहार नियोजन

पथ्य आहार ( हे खावे ) :

 1. अन्नवर्ग : गहू, जुने तांदूळ किंवा भाजलेल्या तांदळाचा भात
 2. द्विदल वर्ग (डाळी) : मूग, कुळीथ, उडीद, तूरडाळ, मसूर
 3. फ़ळभाज्या : पडवळ्, दुधी भोपळा, भेंडी, दोडका, घोसावळे, कोबी, नवलकोबी, सुरण, शिमला मिरची
 4. शाकवर्ग ( पालेभाज्या ) : चाकवत, तांदुळजा, चवळी, करडई, काठेमाठ, राजगीरा, आले, हळद, लसूण, कांदा, गाजर, कोहळा, मूळा, मोहरी
 5. पोळीच्या कणकेत २-३ चमचे एरंड तेल टाकून पिणे.
 6. गाईचे दूध, तूपा, लोणी, खवा, लोणी, लोणी असलेले ताजे गोडसर ताक, गोमूत्र
 7. चहा घेत असल्यास आले, खडीसाखर, गवती चहा टाकलेला १/२ कप चहा 
 8. फ़ळे : गोड आंबे, काळे मनुके, खजूर, द्राक्षे, जर्दाळू, बेदाणे, अंजीर, डाळींब, मोसंबी, नारळाचे पाणी, सफ़रचंद

अपथ्य आहार (हे खाऊ नये ):

 1. अन्नवर्ग : वरी, बाजरी , नाचणी , जव
 2. शाकवर्ग ( पालेभज्या ) – वर सांगितलेल्या पालेभाज्यांव्यतिरिक्त इतर पालेभज्या.
 3. द्विदलवर्ग ( डाळी ) – मटकी, वाल, वाटणे, पावटा, डबलबी, घेवडा, मटार, छोले, चणे, चवळी, हरभरा, बेसनाचे पदार्थ.
 4. फ़ळभाज्या – वांगे, तांबडा भोपळा
 5. कंद – रताळे, बटाटा, साबूदाणा
 6. थंड पाणी पिऊ नये, तहानेशिवाय पाणी पिऊ नये, अधिक मीठ खाऊ नये, शिळे अन्न खाऊ नये. 
 7. फ़ळे – जांभूळ, कच्चा ताडगोळा, सुपारी, अननस, कलिंगड, संत्री
 8. विरुद्धाअन्न : मूगाची खिचडी + दूध, फ़्रूट सॅलेड (दूध+फ़ळे), दही+भात, केळ्याचे शिकरण, चहाचे आधी किंवा नंतर लगेच पाणी पिणे.
 9. आंबवलेले पदार्थ : इडली, डोसा, ढोकळा, उत्ताप्पा, 
 10. म्हशीचे दूध, आइस्क्रिम
 11. व्यसन- दारु, सिगरेट, तंबाखू, इ.
 12. बाहेरचे पदार्थ: बेकरी प्रॉडक्टस्, चायनीज, फ़ास्ट फ़ूड, बर्गर, समोसा, पिझ्झा, वडापाव, मिसळ, 
 13. शिळे पाणी (कालचे पाणी आज पिणे ) 
 14.  मांसाहार – ब्रॉयलर कोंबडीचे चिकन

विहार (वागण्या फ़िरण्यातील नियम )

 1. थंड पाण्याने आंघोळ, पिणे टाळावे. पिण्यासाठी व आंघोळीसाठी गरम पाणी प्यावे.
 2. रोज सकाळी काऊंटर वरुन दिलेले सुगंधी उटणे लावून कोमट पाण्याने आंघोळ करवी.
 3. दिलेले नस्याचे औषध रोज नाकात टाकणे (२ थेंब दोन्ही नाकपुड्यांत २ वेळा )
 4. सकाळचे जेवण ११ पूर्वी व रात्री ८ च्या आधी करावे.
 5. मल मूत्राच्या वेगांचे धारण करू नये.
 6. वेडेवाकडे बसने / झोपणे टाळावे.
 7. दुखणार्या जागी हलक्या हाताने दिलेले तेल लावून मालिश करणे व नंतर शेकणे ( खडे मीठ तव्यावर गरम करुन कापडात बांधून पुर्चुंडी करुन / गरम पाण्याची पिशवी / एलेक्ट्रिक हिटिंग पॅडने.)
 8. अतिमैथुन / अतिव्यायाम टाळावा., थंड पाण्यात पोहणे, आंघोळ करणे टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Book Your Appointment

For Appointment fill in the form below or call us.


  ×

  Hello!

  Click below to chat on WhatsApp

  × How can I help you?