गेला थंडीचा महिना, झटपट वमन करा
आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा या मराठी गाण्याने मराठी मनांवर बरच अधिराज्य केल.थंडीचा प्रतिकार करण्याची प्रेरणा जणू या गाण्यातून मिळायची. थंडीच्या दिवसात आजरांना वावच नसतो मुळी. त्यामळे दबा धरून बसलेले आजार थंडीचे दिवस संपल्यानंतर आक्रमण करतात. त्यांच्या प्रतिकार साठी म्हणून “ गेला थंडीचा महिना झटपट वमन करा ” हा सल्ला.
हिमालयामध्ये थंडीच्या दिवसात बर्फ पडून ऊन तापू लागताच हा बर्फ वितळून तिकडील नद्यांना उन्हाळ्यामध्ये पूर येतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात होते. थंड ऋतूत, थंडी तसेच पौष्टिक आहारामुळे शरीरात कफ जमा होवू लागतो. त्याला “वसंत ऋतू” असे म्हणतात. या उन्हाळ्यामध्ये शरीरात जमा झालेला कफ पातळ होवून नद्यांना पूर यावा त्याप्रमाणे हे दोष केसापासून नखापर्यंत सर्व शरीर व्यापतात. मग विविध आजार नव्याने उद्भवतात व जुने आजार उचल खातात. डॉक्टरांची पायरी याच वेळी तुम्ही चढता असा तुमचा अनुभव असेल. या आजारांना आला घालण्यासाठी तुम्ही युध्यपातळीवर अयशस्वी प्रयत्न करतात. होय! अयशस्वी प्रयत्न ! कारण नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा पाणी गावामध्ये घुसते. गावातील पाण्याचा उपसा करण्याची आवश्यकता नाही. नदीचा पूर ओसरतोच, गावातील पूर आपोआप कमी होणार. अगदी हेच गणित वसंत ऋतूत वाढलेल्या आजारान संदर्भात. दोष कोठ्यात वाढले, तेथून सर्व शरीरभर पसरले. त्यामुळे आजारांवर काम करण्या ऐवजी वाढलेले दोष कोठ्यातून बाहेर कडून फेकल्यास “ ना रहेगा बास, ना रहेगी बासुरी “. वाढलेले दोष घाऊक प्रमाणावर बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला “वमन” ( उलटी करवणे ) असे म्हणतात.
अशा तहेची शुद्धिप्रक्रिया अमलात न आणल्यास पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलओ वैसा प्रमाणे वाढलेले दोष ज्या ज्या अवयवांमध्ये जाणार तशा स्वरुपाचे आजार होणार. सर्दी, ताप, खोकला, उलट्या, अंगावर पित्त उठणे, श्वास लागणे अशा स्वरुपाचे काहिही होणार. याउपरी सुद्धा दोषांचा उपसा केला नाही हे पाणी तिथेच खोल खोल मुरणार. यालाच तुम्ही जीर्ण, जुनाट आजार म्हणता जसे डायबिटिस, हृदयविकार, त्वेचेचे विकार, दमा. अशा वेळी तुम्ही म्हणता, या पॅथीची, त्या पॅथीची औषधे केली पण काही गुण आला नाही. कालपर्यंत एका गोळीने काम भागायचे पण आता दोन सुद्धा कमी पडतात.’
अशावेळी सुद्धा इलाज एकच पंचकर्म म्हणजे पुन्हा वमनच. तेव्हा आजार वाढवून घेण्यापूर्वीच वमन करून स्वास्थ्यलाभ घेणे काय वाईट ? हा उपचार लहान बालकापासून ६० वर्षाच्या स्त्री व पुरुष दोघांनाही करुन घेता येतो.
काही लोक विचारतात, मागील वर्षी वमन केले होते परत या वर्षी कशाला? काल जेवलो, काल कपडे धुतले मग केव्हाच जेवायला किंवा कपडे धुवायला नको काय ? गाडीचे अॅव्हरेज वाढण्यासाठी नियमित सर्व्हिसिंग आवश्यक असते. तसेच पंचकर्माचे. गाडीचा एखादा पार्ट निकामी झाला तर बदलता तरी येतो पण या देव देणगी असलेल्या देहाचे काय ? नियमित पंचकर्मामूळे आजार तर होतच नाहीत शिवाय निरोगी दीर्घायुष्य बोनस स्वरुपात लाभते.
म्हणून प्रत्येकाने दर वसंत ऋतुमध्ये वमन केल्यामुळे ऋतुजन्य विकार होत नाहीत. तसेच असलेले, वाढलेले आजार कमी होतात. सर्दी, ताप, त्वचेचे विकार, पोटाचे विकार, अम्लपित्त, डोकेदुखी, आमवात आदी विकारांकरीता वमनाचा प्रामुख्याने विचार वैद्यांच्या सल्ल्याने करु शकता.
वमन पंचाकर्माची सविस्तर माहिती करून घेण्यासाठी आजच वैद्य पृथ्वीराज उगळे किंवा वैद्य पल्लवी उगळे यांच्याशी संपर्क साधा. वसंत ऋतु सुरु झाला आहे; वेळ दवडू नका.
Shree Vishwa Swasthya Ayurvedic Clinic & Panchakarma Chikitsalaya, Akurdi, Pune-35
वमन पंचकर्म
शरीरात वाढलेले दोष उलटीद्वारे शरीरातून बाहेर काढून टाकणे
वारंवार सर्दी, ताप, खोकला, दमा, अस्थमा, भूक न लागणे, मळमळ, आम्लपित्त, आमवात, सोरिआसिस, त्वचाविकार, मधुमेह, थायरॉईड, PCOD, वजन वाढणे या आजारांसाठी उपयुक्त.
कालावधी – वसंत ऋतू
(फेब्रुवारी व मार्च महिना)