Festival & Ayurved – Shree Vishwa Swasthya Ayurveda

Height Gain in Navaratri
उंची वाढविणे शिबीर (Height Gain)

उंची वाढवा. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर

Height Gain in Navaratri

मग आजच शिबिराला भेट द्या…..

वयोमर्यादा 7 ते 21 वर्षापर्यंत

औषधांची वैशिष्ट्ये :

आयुर्वेदिक औषधाने उंची वाढण्यास मदत होते.

हे पूर्णतः निर्धोक व दुष्परिणाम रहित आयुर्वेदिक औषध आहे.

एक वेळ औषध घेतल्याने पाव से. मी. असून तीन इंचापर्यंत उंची वाढते असा अनुभव आहे.

या औषधाचे परिणाम औषध घेतल्यास एक ते चार महिन्यात दिसून येतात.

औषधांचा उपयोग व्यक्तिमत्व विकासासाठी निरनिराळ्या परीक्षांच्या पात्रतेसाठी व ज्यांचे आई-वडील उंचीने कमी आहेत. याबरोबरच न्यूनगंडाच्या भावना दूर होण्यासाठी चांगली मदत होते.

औषध नवरात्री तच का सुरू करावे ?

नवरात्र हा पितृ पंधरवडा संपल्यानंतर लगेच येणारा सण आहे. नवरात्रीमध्ये घटस्थापना करून त्याची पूजा केली जाते. नवरात्री मध्ये शरद ऋतू संपून हमंतची सुरुवात होत असते. त्यावेळी शरीराचे पोषण होण्यासाठी हेमंत ऋतू उत्तम. म्हणून उंची वाढवण्यासाठी नवरात्री कालावधी उत्तम. आयुर्वेदानुसार शरीरात वात, पित्त व कफ असे तीन दोष असतात यापैकी कफ दोष शरीरातील वाढीसाठी आवश्यक असतो.

प्राकृत कफापासून शरीरातील सप्तधातु वाढून शरीराचा सर्वांगीण विकास होतो. वर्षातून नवरात्र ते मकर संक्रांत याच काळात शरीरात प्राकृत कफाची वाढ होत असते कफामुळे साम्या अवस्था तयार होऊन परस्पर पूरक असे वातावरण बनते आणि हाडांची वाढ होते म्हणून या काळात उंची वाढवण्यासाठी औषध घेतल्यास अधिक प्रभावी ठरते.

3 महिन्यांचा कोर्स

प्रत्येक वेळी 1 महिन्याची औषधे दिली जातात.

आहाराबद्दल मार्गदर्शन.

व्यायामाबद्दल मार्गदर्शन

II श्री विश्वस्वास्थ्य II

आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म चिकित्सालय

पत्ता:
Plot no.154, Sector 27/A संत तुकाराम उद्यानाजवळ, यशवंतराव चव्हाण स्मारक समोर, निगडी प्राधिकरण, पुणे- 411044

डॉ. पृथ्वीराज उगळे
(MD Panchakarma)
8087236239

डॉ पल्लवी उगळे
(MD ayurved)
9168009138

भेटण्याची वेळ:
10am- 2pm & 6 – 9pm
Sunday by appointment

अपॉइंटमेंट साठी मोबाईल नं.
8208950728

दिवाळी आणि आयुर्वेद
Diwali And Ayurved

दिवाळी हा भारतभरातील महत्त्वाचा सण. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला काही संदर्भ आहेत. त्यातील अनेक प्रथा, परंपरांच्यामागे आयुर्वेदातील अनेक शास्त्रीय संकल्पना आहेत. त्या समजून घेऊया !

कार्तिक महिना म्हणजे शरदाचा उत्तरार्ध, हळूहळू हवेमध्ये कोरडेपणा वाढू लागतो. अश्विनाच्या सुरुवातीला हैराण करणारा उन्हाचा कडाका थोड़ा कमी होऊन, सकाळी व रात्री हवेमध्ये गारवा यायला सुरुवात होते. दिवस लहान आणि रात्री मोठ्या, असे एकूण सर्व वातावरण असते. कार्तिकाच्या सुरुवातीला येणाऱ्या दिवाळी या सणामध्ये असणाऱ्या अनेक प्रथा, परंपरांच्यामागे, आयुर्वेदातील अनेक शास्त्रीय संकल्पना आहेत असे दिसते.

दिवाळीला सगळ्यात महत्त्वाचा सोपस्कार म्हणजे अभ्यंगस्नान नरकचतुर्दशीच्या दिवशी ही प्रथा पाळली जाते. या सुमारास हवेमध्ये हळूहळू कोरडेपणा वाढत चाललेला असतो, त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्वचेची ही रुक्षता वेळीच आटोक्यात ठेवण्यासाठी, स्निग्ध गुणाचे तेल सर्व अंगाला जिरवणे म्हणजे अभ्यंग करणे. अभ्यंगस्नान फक्त दिवाळीच्या दिवशी करायचे नसून, त्यानंतर पूर्ण हेमंत आणि शिशिर ऋतूपर्यंत म्हणजे जवळजवळ होळीपर्यंत, रोज किंवा आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा करायचे आहे. त्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात. नित्य अभ्यंग केल्यामुळे तारुण्य टिकून राहते, त्वचा तजेलदार राहते, शरीर बांधेसूद राहते, आयुष्य वाढते, दृष्टी सुधारते आणि हो मुख्य म्हणजे मन अतिशय प्रसन्न राहते.

अभ्यंग केल्यानंतर साबण न वापरता, सुगंधी उटणे किंवा मसूर डाळीचे पीठ अंगाला चांगले चोळून लावावे, त्यालाच आयुर्वेदाच्या भाषेत उद्वर्तन असे म्हटले जाते, मगचं आंघोळ करायची आहे. उद्वर्तनामुळे शरीराची रोमरंध्र स्वच्छ होऊन, रक्तप्रवाहण सुधारते, त्वचा नितळ होते, अंगावरील फाजील चरबी कमी होते आणि अग्नि चांगलाच प्रज्वलित होतो. जे खाऊ ते पचते व अंगी लागते.

या महिन्यातली आणखी एक प्रथा आहे, ती म्हणजे कार्तिकस्नान, आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा, असे महिनाभर रोज पहाटे उठून स्नान करणे. रात्र मोठी असल्यामुळे झोप जास्त होते आणि पहाटे गारवा असल्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपावेसे वाटते. पण उशीरापर्यंत झोपल्याने थंडी तर पळत नाहीच, पण उलट आळसावलेपणाच जास्त येतो, म्हणून पहाटे पहाटे स्नान केल्याने थंडी वाजण्याची बंद होते, शरीर आणि मन प्रसन्न होऊन दिवसभराच्या कामाचा उत्साह वाढतो.

दिवाळीच्या सुमारास, साधारणपणे खरीपाची पीके निघालेली असतात. घरे धनधान्याने भरलेली असतात. गळीताची धान्येही निघालेली असतात व त्याचे ताजे तेल काढलेले असते. वर्षा ऋतूत मंदावलेली भूक आणि पचनशक्ती आता वाढीला लागलेली असते. अशा अनुकूल काळात, निसर्गाचे देणे साजरे करण्यसाठी, घरात असणारी वेगवेगळी धान्ये एकत्र करून, त्याची भाजणी करून त्याच्या चकल्या कडबोळी करून तसेच करंज्या, शंकरपाळे, लाडू, अनारसे अशी मिष्टान्ने बनवून, सर्वांनी मिळून एकत्र त्याचा आस्वाद घेणे, ही दिवाळीच्या फराळामागची खरी संकल्पना या फराळाच्या पदार्थांमध्ये मैदा, वनस्पती तूप, साखर या गोष्टींचा वापर टाळता आला तर फारच उत्तम. त्याऐवजी कणीक, गूळ, साजूक तूप, तिळाचे तेल वापरले तर, हाच फराळ अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी होईल सध्या चिवडा, चकली, शेव, लाडू इत्यादी वस्तू बाराही महिने आपल्या घरामध्ये असतात, त्यामुळे दिवाळीत त्याचे विशेष अप्रूप वाटेनासं झालंय हेही खरचं आपण हे सर्व पदार्थ कधीही बनवू. आणू शकतो, पण ते पचवण्यासाठी लागणारी पचन शक्ती मात्र याच कालावधीत असते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे बारा महिने दिवाळी साजरी करणे, जरी आपल्या खिशाला एखादवेळ परवडले, तरी आपल्या आरोग्याचे मात्र दिवाळे काढणारे ठरते हे निश्चित.

अशा तऱ्हेने दिवाळीच नाही, तर प्रत्येक भारतीय सण हा आपल्यासाठी आनंद आणि आरोग्य अशी दुहेरी भेट घेऊन येतो. गरज आहे या सगळ्याकडे डोळस दृष्टीकोनातून बघण्याची!

वैद्य उर्मिला पिटकर, मुंबई, एम् डी. पीएच् डी. (आयुर्वेद) यांचे लेखातून साभार.