Admin – Shree Vishwa Swasthya Ayurveda

बस्ति पंचकर्मासाठीचे नियम
बस्ति चे तेलबस्ति व काढाबस्ति असे दोन प्रकार असतात.

तेलाचा बस्ति घेण्यापूर्वी नेहमी मूगाच्या डाळीची खिचडी किंवा पथ्यात सांगितलेला हलका आहार घ्यावा.

काढ्याचा बस्ति नेहमी उपाशीपोटी घ्यावा किंवा आधीचे घेतलेले जेवन पचलेले असावे. (काढ्याचा बस्ति घेण्यापूर्वी ४-५ तास काही खावू नये.

सर्दी, ताप, खोकला, कणकण असताना बस्ति घेऊ नये.

पाळीच्या दिवसात बस्ति घेऊ नये. पाळी संपल्यानंतर प्रथम तेलाचा बस्ति घ्यावा व नंतर पुढील बस्तिंचा क्रम चालू ठेवावा.

काही कारणास्तव पोट दुखल्यास पोट गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. गरम पाणी व ओवा डॉक्टरांना विचारुन खावा.

बस्ति सुरु असताना दिवसभर पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा.

थंड पाणी पिणे व थंड वातावरण टाळावे.

मल मूत्रांच्या वेगांचा अवरोध करु नये.

व्यायाम अथवा कष्टाची कामे करु नये.

रागावणे, चिंता करणे, शोक करणे टाळावे.

ऊन, वारा, पाऊस यांचे सेवन करु नये.

दिवसा झोपू नये, रात्री जागरण करु नये.

प्रवास करणे टाळावे.

फ़ार बोलणे, एकाच ठिकाणी बसणे, उभे राहाणे टाळावे.

फ़ार उंच उशी किंवा अजिबात उशी न घेणे टाळावे, समतल  उशी घ्यावी.

धूर, धूराळा यांपासून दूर राहावे.

ब्रह्मचर्याचे पालन करावे.

पंचकर्म सुरु असताना मूगाची पातळ खिचडी थोडे तूप टाकून घ्यावी.

भाताची पेज धने जीरे तूपाची फ़ोडणी देवून घेणे.

बस्तिसाठी येताना सोबत टॉवेल, नॅपकिन, स्कार्फ़, स्वेटर / जर्किन, सॉक्स, गरम पाणी, बस्ति सिरींज, दोन कॅरिबॅग, मूग खिचडी चा डबा घेऊन येणे.

बस्तिसाठी येताना आपणास दिलेली बस्ति सिरींज जंतुसंसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ करुन घेऊन यावी. प्रथम सिरींज गरम पाण्याने धुवावी, नंतर ती साबणाच्या पाण्याने बॉटलक्लिनरच्या सहाय्याने स्वच्छ धुवावी. त्यानंतर सिरींज उकळत्या पाण्यात ३-५ मिनिट ठेवून नंतर कोरडी करुन स्वच्छ कॅरी बॅग मध्ये ठेवावी.

पंचकर्मासाठी दवाखाण्यात येत असताना मौल्यवान वस्तु / दागिणे सोबत आणू नये अथवा स्वत:च्या जबाबदारीवर आणावेत. गहाळ झाल्यास क्लिनिक / डॉक्टर जबाबदार राहणार नाहीत.

* हे नियम पंचकर्म सुरु असताना व त्यानंतर जितके दिवस पंचकर्म सुरु होते त्याच्या दुप्पट दिवस पाळावेत.

नस्य पंचकर्माचे नियम
नस्य हे पंचकर्म पाऊस पडत असताना करु नये.

७ वर्षाखालील मुले, गर्भीणी यांनी नस्य करु नये.

नस्यापूर्वी व नस्यानंतर १ तास काहीही खाऊ अथवा पिऊ नये. १ तासापूर्वी भूक लागलेली असल्यास हलका आहार घ्यावा.

नस्य हे पंचकर्म सुरु असताना थंड पदार्थ खाऊ अथवा पिऊ नये.

नस्यापूर्वी व नस्यानंतर थंड पाण्याने डोक्यावरुन आंघोळ करु नये; छोटे केस असनारे पुरुषांनी कोमट पाण्याने केस धुवावेत. व आंघोळीनंतर कोरडे करावेत, केस ओले ठेवू नयेत.

मद्यपान करु नये.

आहार पचण्यास हलका, गरम असावा.

पाणी गरम प्यावे.

मल, मूत्रांच्या वेगांचा अवरोध करु नये.

रागावणे, शोक, चिंता करु नये.

ऊन, वारा यांचे सेवन करु नये.

दिवसा झोपू नये व रात्री जागरण करु नये.

लांबचा प्रवास करणे टाळावे.

नस्यानंतर लगेच हसने, बोलणे, रागावने, शोक करणे टाळावे.

व्यायाम करु नये.

फ़ार उंच किंवा उशी न घेणे टाळावे.

ब्रह्मचर्याचे पालन करावे.

धूर, धूरळा यांचेपासून दूर राहावे.

नस्य पंचकर्मासाठी येताना तोंडाला बांधण्यासाठी स्कार्फ़, टॉवेल, सॉक्स, नॅपकिन या वस्तू सोबत आणाव्यात.

अम्लपित्त सध्याचा ज्वलंत प्रश्न
आपण सध्या बघतो पैसा, काम, संसार, टेन्शन, जबाबदारी व संघर्षमय व धावपळीचे झाले आहे. प्रत्येक मनुष्य सध्या तणावग्रस्त जीवन व त्यामुळे व्याधीग्रस्त झालेले शरीर घेवून जीवन संघर्ष करीत असलेला दिसतो. अशा स्पर्धात्मक युगात Hurry (धावपळ), Curry (मसालेयुक्त आहार ), Worry (चिंता) प्रत्येक व्यक्तीमध्ये अम्लपित्त (Acidity) निर्माण करत असल्याचे दिसून येते. त्यासाठी अनेक प्रकारची Antacids घेवून फ़रक पडत नाही. पुढे एन्डोस्कोपी व अन्य तपासण्या चालू राहतात. तेव्हा पर्यायी उपचार पद्धती म्हणून लोक आयुर्वेदाकडे येतात.

आयुर्वेदामध्ये अम्लपित्तासाठी अतिशय परिणामकारक औषधी व विरेचनासारखे दीर्घकाळ उपशय देणारे उपचार सांगितलेले आहेत. अम्लपित्त होण्यासाठी मुख्य कारण असते ते म्हणजे अनियमित आहार- विहार म्हणून निदान परिवर्जन करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणे गरजेचे असते. सकाळी लवकर उठावे. सकाळी १ कप दूधात १ चमचा साजूक तूप टाकून घेणे. सकाळी भाजी पोळीचा नाष्टा व दुपारी १२ वा. जेवण, पुन्हा सायंकाळी ७ च्या आत जेवण घेणे व रात्री लवकर झोपणे. झोपण्यापूर्वी शक्य झाल्यास दुध तूप घेणे. आहारातून अतितिखट, आंबट, तळलेले, खारट पदार्थ, दही, लिंबू, लोणची, काळा मसाला, हरभरा, तूरडाळ, बाजरी, अतिप्रमाणात चहा घेणॆ वर्ज्य केल्यास कुठल्याही औषधाविना रुग्णास उपशय मिळतो. मात्र काही व्यक्तिंमध्ये कारण नसताना चिंता / टेन्शन घेणे हे देखील मुख्य कारण असते. अशा व्यक्तिंनी ’निर्लज्जम् सदासुखी’ या मंत्राचे अनुकरण करणे म्हणजे चिंताविरहित राहणे फ़ायदेशीर ठरते अम्लपित्त असलेले अनेक लोक रोज सकाळी पाणी पिऊन उलटी करतात. पण हि चुकिची पद्धत आहे. कारण पित्ताची शुद्धी विरेचनानेच ( जुलाबाद्वारे) झाली पाहिजे. अन्यथा रोजच्या उलटीमुळे व अम्लपित्तामुळे अन्ननलिकेस इजा होऊ शकते. १५ दिवसातून एकदा जुलाब – विरेचन घेतले तरी दीर्घकाळ त्याचा फ़ायदा झालेला दिसून येतो. त्यासाठी आयुर्वेदिक वैद्याचे मार्गदर्शन उपयुक्त. शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन नावाचे पंचकर्म करुन घेतल्यास अशुद्ध् पित्ताची मोठ्या मात्रेने शुद्धी होते म्हणून अम्लपित्तासाठी विरेचन घेणे श्रेयस्कर.

डॉक्टर, थंडी पडली, आभाळ आले की माझे सांधे दुखतात, काय करु ?
आयुर्वेद उवाच : शरीरामध्ये होणार्या कोणत्याही प्रकारच्या वेदना या दुष्ट झालेल्या वातामुळे किंवा दुष्ट रक्तामुळे होतात्. शरीरात वेदना उत्पन्न करण्याचा धर्म वातामध्ये अधिक असतो. ( वेदना वातात् ऋते नास्ति ।) वात हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असून त्याचे आपल्या शरीरातील सूक्ष्मातिसूक्ष्म हालचालींपासून ते आपण चालतो, बोलतो, धावतो या सर्व हालचालींवर नियंत्रण असते.वातावरण किंवा आहार विहार यामुळे शरीरात रुक्षता व शीतता वाढली की या वाताची वृद्धी होते. कारण रुक्ष आणि शीत हे वाताचे प्रमुख गुण आहेत. अशाप्रकारे कुपित झालेला वात जेव्हा सांधे, मांसपेशी, मणके याठिकाणी स्थानसंश्रय करतो (आश्रय घेतो ) त्यावेळी सांधेदुखी, हातपायाच्या शिरा आखडणे, हातापायांमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना होणे, हात पाय किंवा शरीरातील एखाद्या ठिकाणी सुंधपणा जाणवने अशी निरनिराळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणासोबत पोट साफ़ न होणे, पोटात गॅसेस होणे अशी लक्षणेही दिसतात. कारण, वाताची निर्मिती अन्नपचनच्या शेवट्च्या भागात म्हणजे मोठ्या आतड्यात जेथे मलाची निर्मिती होते तेथेच होते. या वातावरण व आहार विहारामुळे वाढलेल्या वातावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाताच्या रुक्ष आणि शीत या गुणांच्या विरुद्ध स्निग्ध, उष्ण अशी चिकित्सा जसे शरीराला तेल लावणे ( स्नेहन ), वाफ़ देणे (स्वेदन) उपयुक्त ठरते. स्निग्ध, उष्ण असा आहार आणि पंचकर्मातील बस्ति या चिकित्सेचादेखील उत्तम उपयोग होतो. त्यासोबत काही वातशामक औषधी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

वातविकार आणि विरेचन चिकित्सा
अनियमित आहार-विहार, सततचा प्रवास, टेन्शन यामुळे पित्ताप्रमाणेच वातदोषाचाही प्रकोप होत असल्याने वातदुष्टीचे संधिवात, कंबरदुखी, डोकेदुखी, लकवा (Paralysis) असे पेशंट दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. संधिवातने ग्रस्त असलेले रुग्ण फ़रक पडत नाही म्हणून सतत डॉक्टर बदलत राहतात व अखेर सतत आजाराच्या चिंतेने ग्रस्त असतात. संधिवाताने ग्रस्त असलेले रुग्ण पोट साफ़ असले की बरे वाटते, वेदना कमी वाटतात असे म्हणताना दिसतात. वाताची निर्मिती अन्नपचनच्या शेवट्च्या भागात म्हणजे मोठ्या आतड्यात जेथे मलाची निर्मिती होते तेथेच होते. अपचनातून तयार होणारा वात खराब तयार होतो आणि हा दुष्ट झालेला वात सांधे, मांसपेशी, मणके याठिकाणी स्थानसंश्रय करतो (आश्रय घेतो ) त्यावेळी सांधेदुखी, हातपायाच्या शिरा आखडणे, हातापायांमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना होणे, हात पाय किंवा शरीरातील एखाद्या ठिकाणी सुंधपणा जाणवने अशी निरनिराळी लक्षणे दिसू लागतात. अपचनातून तयार झालेला खराब वात हा वातविकाराचे प्रमुख कारण असतो. त्यासाठी बद्धकोष्ठता हे एक प्रमुख कारण सांगितलेले आहे. म्हणून त्यावरची मुख्य चिकित्सा ’बस्ति’ सांगितली आहे. त्याबरोबर मृदुविरेचन हे देखील सांगितले आहे. (स्नेह: स्वेद: संशोधनं मृदु ।)

त्वचाविकार आणि विरेचन
सोरियासिस (Psoriasis), दाद (Fungal Infection), इसब (Eczema) ,पांढरा कोड (Leucoderma), अंगावर पित्त उठणे (Urticaria) यासारखे अनेक प्रकारचे त्वचारोग हल्ली व्यवहारात पाहायला मिळतात. आयुर्वेदानुसार त्वचाविकार हे मुख्यत: रक्तदुष्टीमुळे होतात. रक्तदुष्टी होण्यामागे अनियमित आहार- विहार, आंबट, खारट, तिखट, विदाही, शिळे अन्नसेवन, रात्री जागरण करणे, दिवसा जेवून लगेच झोपणे ही पित्त बिघडवणारी कारणे जबाबदार असतात. कारण आपल्या शरीरात पित्त हे रक्ताच्या आश्रयाने राहाते. अशाप्रकारे दुष्ट झालेले रक्त, पित्त, क्लेद हे त्वचेमध्ये जावून खाज येणे, त्वचेचा रंग बदलणे, त्वचेवर जखमा होणे, पू येणे, पाणी येणे अशी निरनिराळी लक्षणे वात, पित्त, कफ़ यांच्या अधिक्यानुसार निरनिराळी लक्षणे निर्माण करतात. त्वचाविकारांत प्रामुख्याने पित्त व रक्त यांची दुष्टी आढळून येत असल्याने त्वचेच्या आजारात विरेचन व रक्तमोक्षण हे पंचकर्मातील उपचार त्वचाविकारांचा नाश करणारे, आरोग्य, आयुष्य संवर्धित करणारे ठरतात. याचसोबत विविध आयुर्वेदिक लेप सुद्धा उपयोगी ठरतात.

विरेचन म्हणजे काय ?
विरेचन म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने करविलेला जुलाब होय. शरीरात वाढलेला पित्त दोष जुलाबाद्वारे शरीराच्या अधोमार्गाने बाहेर काढून टाकणे म्हणजे विरेचन (Laxation) होय. विरेचन हे लहानांपासून वृद्धांपर्य़ंत ऋतुनुसार शारीरिक बलानुसार, अवस्थेनुसार व आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेता येऊ शकते. शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन करण्यासाठी विरेचनापूर्वी वर्धमान मात्रेत म्हणजे वाढत्या मात्रेत औषधानी सिद्ध केलेले तूप (घृतपान ) घेण्यास सांगितले आहे. म्हणजे त्यामुळे जठर, आतड्यांना स्नेहनाचे ( मालीश – Lubrication ) कार्य होऊन विरेचनाच्या औषधाने शरीरातील दोष विनासायास बाहेर निघून जाण्यास मदत होते. हे आभ्यंतर स्नेहन ३ दिवस, ५ दिवस अथवा ७ दिवस रुग्णाच्या कोठ्यानुसार – पचनशक्तिनुसार केले जाते. अशा पद्धतीने शरीर आतून स्निग्ध झाल्यानंतर २-३ दिवस शरीराला बाहेरुन स्निग्ध करण्यासाठी मालीश वाफ़ ( स्नेहन स्वेदन ) केली जाते. त्यानंतर रुग्णाच्या आजारानुसार, प्रकृतीचा, बलाचा, ऋतुचा विचार करुन विरेचनाचे औषध दिले जाते. विरेचनामुळे जुलाब होत असले तरी यामध्ये शरीर जुलाबासाठी तयार करुन त्यानंतर जुलाब करविले जातात. त्यामुळे शरीरात जुलाबानंतर (विरेचनानंतर) थकवा न येता शरीर हलके होते.

What is बस्ती ?
ऋतू बदलला उन्हाळा संपला, पावसाळा सुरु झाला. आपली भूक अचानक कमी झाली, पाण्याची गरज सुद्धा पूर्वीपेक्षा उणावली. परंतु आपण कशाचीच उणीव भासू दिली नाही. पूर्वीसारखेच ढासू जेवण, तेवढेच पाणी. परिणामी अनेकांना जुलाब झाले कारण शरीराने जुलाबाद्वारे अति ते बाहेर फ़ेकले. त्याच परिणामी बरेच जणांना उलट्या झाल्या. काहींच अम्लपित्त वाढण्यावर निभावलं. उलटी वा जुलाबाद्वारे बाहेर पडण्याचे भाग्य सर्वांना नाही लाभलं. अशांना Constipation  ( मलबद्धता ) झाले, पोट फ़ुगलं, पोट दुखलं, तोंडाला चव वाटेनाशी झाली, अना उशीरा पचू लागले, अनेकांना उगीचच थकवा जाणवू लागला. काहींनी तर टॉनिकची मागणी सुद्धा केली. बरेच जणांना डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी सारखे वाताचे विकार वाढले. अनेकांना अंगावर पित्त उठले, त्वचेचा कुठलाही विकार असल्यास तो उमळला. दमेकरी लोकांना सर्दी जाणवू लागली. आता लवकरच श्वास लागणार अशी भिती मनात आली तोच धाप लागायला लागली. पाऊस आला काय त्यांची तर सुख चैनच हरपली.

पुरे झाले हे ऋतु बदलाचे कौतुक ! महत्वाचा प्रश्न आहे, यावर ईलाज काय ? पावसाळा म्हणजे बस्ती या गणितामुळे या ऋतुतील “ सब दुखों के लिए एक ही दवा बस्ती ! “ एका पुस्तकात वाचलं होतं ’ ज्याचं पोट साफ़ त्याला सब रोग माफ़’ वर्षातील तीन ऋतूत पंचकर्म विभागलेली आहेत. शरदात विरेचन, रक्तमोक्षण असेल तर वसंतात वमन. पण आता विरेचनाच्या आठवणीत रमण्याचं, पुण्याईत जगण्याचं कारण नाही ; आत्ताचं पंचकर्म आहे….बस्ती !!!

ज्यांच पोट व्यवस्थित साफ़ होत नाही.त्यांना मलावरोध, लघवीच्या तक्रारी, शुक्रासंबंधी आजार, पाळीविषयी विकार, पोटात गोळा येणे, पोट फ़ुगणे, कंबर दुखणे, अम्लपित्त, डोकेदुखी, सर्दी, मूळव्याध, आदि विविध आजार, छळायला तयार होतात. या सर्व आजारांचा एकच ईलाज तो म्हणजे बस्ती.

अपानोऽपानग: श्रोणिबस्तिमेढ्रउरुगोचर: ।

शुक्राआर्तव शकृत् मूत्र गर्भ निष्क्रमणक्रिय: ॥

वायुच्या / वातच्या पाच प्रकारांपैकी “अपानवायु” हा गुदस्थानी राहातो आणि कुल्ले, मूत्राशय, शिश्न व मांड्या ह्या स्थानात संचार करतो; व शुक्र, पाळी, मल, मूत्र, गर्भ यांच्या शरीरातून बाहेर पडण्यावर नियंत्रण ठेवतो. वात हा दोष संपूर्ण शरीर व्यापी जरी असला तरी ’पक्वाशय’ म्हणजे मोठे आतडे (Large Intestine) हे त्याचे मुख्य स्थान होय.

बस्ती म्हणजे एनिमाप्रमाणे सोपी क्रिया. गुदद्वारावाटे औषधी द्रव्य पोटात ढकलणे याला बस्ती असे म्हणतात. वाताचे मुख्य स्थान असलेल्या पक्वाशयात बस्ती जात असल्याने बस्ती ही वाताची सर्वश्रेष्ठ चिकित्सा मानली जाते.

वातस्य उपक्रम: ………स्निग्धोष्णा बस्तयो बस्तिनियम: ।

बस्ती आणि एनिमा एकच का ?

नाही. बस्ति देण्याच्या क्रियेवरुन बस्तिची तुलना आधुनिक वैद्यक शास्त्रातील ’ एनिमा ’ या प्रकाराशी केली जाते. परंतु बस्ति व एनिमा हे दोन्ही वेगवेगळे उपक्रम आहेत. कारण एनिमाच उपयोग फ़क्त ग्रथित मलाचे निर्हरण करण्यासाठी केला जातो. याऊलट आयुर्वेदिक्त बस्ती कडून मलनिर्हरणच नव्हे तर इतर अनेक चिकित्सा उपयोगी कर्मे अपेक्षित आहेत. बस्तिद्वारा अनेक औषधे शरीरामध्ये प्रविष्ट करता येत आसल्याने दोषांचे शोधन (Detoxification) , शमन (Pacification), मलसंग्रहण, कृश व्यक्तिला स्थूल करणे, स्थूल व्यक्तिला कृश करणे, नेत्राचे कार्य प्राकृत ठेवणे, शुक्रजनन, वय:स्थापन करणे, बल वाढविणे, वर्ण उजळणे अशा अनेक प्रकारची व अनेक क्षेत्रामध्ये बस्तिचे कार्य दिसून येते. प्रधान्याने वात दोषाची बस्ति ही प्रमुख चिकित्सा आहे.

बस्तिचे उपयोग :

मलावरोध (पोट साफ़ न होणे)

मूतखडा (Urinary Stone)

शुक्रक्षय (Oligospermia)

स्वप्नदोष (Night Fall)

संधीवात (Arthritis)

आमवात (Rheumotoid Arthritis)

मणक्याचे विकार (Spine Disorders)

मानदुखी (Cervical Spondylosis)

कंबरदुखी (Lumbar Spondylosis)

पाठदुखी ( Backache)

गुडघेदुखी (Painfull Knee joint)

टाचदुखी (Heel Pain)

हातापायाला मुंग्या येणे ( Tingling Sensation)

स्लीप डिस्क (Slipped Disc)

सायटिका (Sciatica)

पक्षाघात (Paralysia)

अर्दित( Facial Paralysia)

कंपवात ( Parkinsonism)

स्थौल्य ( Obesity)

कार्श्य (Thinn Body)

केस गळणे (Hair fall)